अध्यक्ष मनोज पाटील यांची पत्रपरिषदेत माहिती

जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.) ला आर्थिक वर्षात १५ कोटी ११ लाख ५८ हजार ७२९ रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे. यात खेळते भांडवल १ हजार ६७ कोटी रुपये असून मनपातील ५ कोटी रुपयांची वसुली केल्याची माहिती अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील यांनी मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी पत्रपरिषदेत दुपारी दिली. यंदा सभासदांसाठी १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष सुनील पाटील, विश्वास सूर्यवंशी, लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर, अनिल गायकवाड, गटनेते तुकाराम बोरोले, सुभाष जाधव, ज्ञानेश्वर सोनवणे, दिलीप पाटील, शामकांत काळे, सुनील निंबा पाटील उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष मनोज पाटील पुढे म्हणाले की, ग.स. सोसायटीने वसुलीचे दावे १५० दाखल केले आहे. दिव्यांग सभासदांना एक लाख रुपयापर्यंत स्वतंत्र वाटप केले असून त्यांना एक लाख जादा कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. विशेष कर्जमर्यादा ४ लाख करून ६ लाख ५० हजार करण्यात आली आहे. मागील वर्षाचा शिल्लक नफा १३ लाख ५० हजार ९६० आहे. यंदा सभासदांसाठी १० टक्के लाभांश देणार आहे. अनुकंपा तत्वाने तीन मयत कर्मचा-यांच्या वारसांना संस्थेच्या सेवेत सामावून घेतले आहे. विशेष कर्जत २ लाख ५० हजाराची वाढ केली आहे. जनता अपघात विमा १ लाखावरून ३ लाख करण्यात येणार आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.







