नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांपासून सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित शाह यांना शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही अमित शाह यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी अमित शाह यांचा उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आधुनिक भारताचे चाणक्य अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दरम्यान अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘भारताचे पितामह’ म्हटले होते. भारताला इतर कोणत्याही देशाचे अनुकरण करण्याची गरज नाही ! भारत हा फक्त भारतच बनला पाहिजे कारण एकेकाळी भारताला ‘सोने का चिड़िया’ म्हटले जात होते असे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य होते. हे वाक्य ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मोदींचा उल्लेख ‘नव्या भारताचे पितामह’ असा केला होता. ‘पंतप्रधान मोदींसारख्या अनुभवी नेतृत्वाला (विकासाचा) मार्ग माहिती आहे, ते मार्ग जाणतात आणि मार्ग दाखवतात! अशा दूरदर्शी नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,’ असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते.







