• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राहुरी येथे दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2020
in क्राईम, महाराष्ट्र
0

राहुरी (वृत्तसंस्था) – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्‍यात लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली. त्यात शीतल बाबासाहेब गोलवड (वय 30) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राहुरी तालुक्‍यातील देवळाली प्रवरा येथील आंबी स्टोअर परिसरात शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर दहाच तासांतच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी, शुक्रवारी रात्री बाबासाहेब विठ्ठल गोलवड (वय-35) हा दारू पिवून उशिरा घरी आल्यानंतर पत्नी शीतल हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू तोपर्यंत लाडजळगाव लागला. शीतल हिने माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगून ती झोपण्यास गेली. बाबासाहेब याने शीतलशी भांडण केले. परंतु शीतलने मला मजुरी मिळालेली नाही. शनिवारी मजुरी मिळाल्यावर पैसे देते, असे सांगितले. परंतु बाबासाहेबने मला आता दारू पिण्यासाठी पैसे दे, असा हट्ट धरला.

पतीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत दोन्ही मुलांसमवेत शीतल झोपली असताना बाबासाहेब याने घरासमोर पडलेला लाकडी दांडा तिच्या डोक्‍यात घातला. त्यात शीतल हिचा जागीच मृत्यू झाला. रागाच्या भरात पत्नीच्या डोक्‍यात लाकडी दांडा मारल्यानंतर व ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून बाबासाहेब याने घटनास्थळावरुन धूम ठोकली. खुनाच्या घटनेची माहिती दोन्ही मुलांनी शेजारी राहात असलेल्या उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांना दिली.

त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेतली. तसेच खून करण्यासाठी वापरलेला लाकडी दांडा ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली. घटनास्थळापासून काही अंतरावरील उसाच्या शेतात लपून बसलेल्या बाबासाहेब यास स्थानिक तरुणांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. शीतलचा भाऊ विजय एकनाथ बर्डे याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

कल्याणमध्ये सीएचा संशयास्पद मृत्यू

Next Post

देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या आत्म्यावर हल्ला – राहुल गांधी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या आत्म्यावर हल्ला - राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
1xbet russia

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

April 25, 2026
मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

April 25, 2026
मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon