चुलत भावानेच केला विश्वासघात ; भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथिल धक्कादायक घटना

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील वांजोळा गावांमध्ये चुलत काकानेच पाच वर्षीय मूकबधिर असलेल्या पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
भावांच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना असून यामुळे चीड व्यक्त होत आहे. भुसावळ तालुक्यातील वांजोळा या गावामध्ये ही घटना घडली. आज पिडीतीच्या वडीलांना दुपारच्या वेळेला घरामध्ये आपली पाच वर्षांची मुलगी दिसत नाही, म्हणून तिच्या वडिलांनी शोधाशोध सुरू केली. त्या वेळेला त्यांना माहिती पडले की, त्यांचा चुलत भाऊ तिला सायकलवर बसवून त्याच्या घरी घेऊन गेला आहे. तेव्हा तो लागलीच त्याच्या चुलत भावाच्या घरी गेला. त्यावेळेला त्याला त्याच्या पाच वर्षाच्या मुलीवर त्याच्या भावाने बलात्कार केले असल्याचे दिसून आले. क्षणभर बापाला काहीच सुचले नाही. थोड्यावेळाने त्याने गावातील पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक यांना बोलावून घटनेची माहिती दिली. त्यानंतर भुसावळ तालुका पोलीस स्टेशन गाठले तिथे पोलीसांना झालेला प्रकार सागितला लागलीच पोलिसांनी घटनास्थळी येऊन काकाला ताब्यात घेतले . मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी तात्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले. नात्याला काळीमा फासणारी ही घटना अत्यंत धक्कादायक असून यामुळे भुसावळसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी गावांमध्ये जाऊन घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली. याप्रकरणी संशयित आरोपी असलेला चुलत भाऊ म्हणजेच मुलीचा काका या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही माहिती कु-हा – वराडसिम गटातील जि.प. सदस्या पल्लवी सावकारे याना कळल्यानंतर लागलीच डॉ उल्हास पाटील हाँस्पिटल मध्ये जाऊन पिडीत मुलीची व आईची भेट घेतली याप्रकरणी वांजोळा येथे पोलिसांनी पंचनामा करण्यात आला आहे. यामुळे भुसावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.







