जळगांव (प्रतिनिधी) : भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती गृह विभागाकडून करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी निघाले आहेत.


येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. मध्यंतरी कुमार चिंथा यांची शासनाने नियुक्ती केली मात्र लगेच त्यांना जळगावचे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती मिळाल्याने येथील पद रिक्त होते. त्यामुळे बुधवारी गृह विभागाने आदेश काढून प्रतिक्षाधीन असलेल्या सोमनाथ वाघचौरे यांच्यासह तिघांना बदलीचे ठिकाण दिले आहे. भुसावळातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे काम सोमनाथ वाघचौरे यांच्यापुढे असणार आहे.







