वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – राज्यातील ठाकरे सरकारने बार सुरु केलेत पण भाजपा कडून काही महिण्यापूर्वी मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. तरी ही राज्यातील निद्रिस्त सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले,आता तर हिंदुधर्मियांचा पवित्र महिना अधिक (पुरुषोत्तम मास) सुरु आहे,व राज्यातील आघाडी सरकारने मंदिरे बंद ठेवली आहेत..
म्हणून राज्यभर संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी व आध्यात्मिक समन्वय आघाडी वतीने दि.13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात मंदिर बंद या काळ्या निर्णयाचा विरुद्ध चार तासांचे लाक्षणिक उपोषण संपन्न झाले. मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य, साधु-संत, अनेक धार्मिक संघटना एकत्र येवून आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण करण्याच्या सूचनेनुसार
त्याअनुषंगाने चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी व हिंदुधर्मीय संघटनाच्या वतीने चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘बालवीर हनुमान मंदिर’, येथे सकाळी 11 ते दु. 2 या वेळेत लाक्षणिक उपोषण व टाळांचा गर्जर व घंट्याचा नाद करण्यात आला. नायब तहसिलदार संजय इखणकर यांना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी मंदिरे उघडण्यासाठी शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेऊन तात्काळ आदेश देऊन सर्व महाराट्राल मंदिरे उघडावीत याचे निवेदन ही दिले. सर्व भा.ज.पा.चे तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा चिटणीस राकेश पाटील,शेतकी संघाचे संचालक हिंमतराव पाटील, ह.भ.प.भाईदास चौधरी,तालुका सरचिटणीस हनुमंतराव महाजन,सुनिल सोनगिरे, डाॅ.मनोहर बडगुजर, ता.चिटणीस भरत सोनगिरेसर, ता.उपाध्यक्ष सुभाष पाटील, विकास शिंदे, युवामोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक, अल्पसंख्याक आघाडीचे संजय श्रावगी, सनातन संस्थेचे संघटक यशवंत चौधरी, ओबीसी उपाध्यक्ष कैलास पाटील, आदिवासी आघाडीचे पिंटु पावरा, विजय बाविस्कर, युवा मोर्चा उपाध्यक्ष, गोपाल पाटील, विवेक गुर्जर, सरचिटणीस भूषण महाजन, आदि पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टसिंग,फेसमास्कचा वापर करुन लाक्षणिक उपोषणात सक्रिय सहभाग घेतला.