जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील खेडी रोड परिसरातील गिताई नगरात राहणार्या महिला वकिलाचा घरातून मध्यरात्रीच्या सुमारास आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केल्याची घटना 6 ऑक्टोंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. दिपाली जयंत काटे (साहू) या 5 ऑक्टोंबर रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास आपला मोबाईल खिडकी जवळ चार्जिंगसाठी लावला. यानंतर त्या झोपून गेल्या. दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उठल्यावर त्यांना त्याचा मोबाईल खिडकीमध्ये दिसून आला नाही. त्यांनी कुटुंबियांकडे मोबाईलबाबत विचारपुस केली असता कोणालाही काही माहित नव्हते. आपला मोबाईल चोरीस गेल्याची खात्री झाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन आठ हजार रुपयांचा मोबाईल लंपास केल्याप्रकरणी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल विसपुते करीत आहेत.