पारोळा (प्रतिनिधी) – तालुका एकलव्य संघटनेने धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती या प्रवर्गा मध्ये समावेश करण्यात येऊ नये यासाठी दि. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे निदर्शने करण्यात आलेत आहेत.तसेच सदरील आंदोलन हे सोशल डिस्टंसिंगचे पालन करून करण्यात आले. असे आशयाचे निवेदन तहसीलदार अनिल गवांदे यांना देण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्ष तान्हाजीराव वाघ,एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र गायकवाड, तालुका उपाध्यक्ष किशोर उत्तम वाघ, विनोद मोहन मोरे, अनिल छगन अहिरे, भाऊसाहेब एकनाथ सोनवणे यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.







