• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कृषी क्षेत्राचा विकास हाच ध्यास घेउन जगणारा नेता म्हणजे हरीभाऊ – अशोकभाऊ जैन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2020
in जळगाव
0

‘आठवणीतले हरीभाऊ’ कार्यक्रमात सर्व पक्षिय नेत्यांनी दिला उजाळा

जळगाव (प्रतिनिधी) – शेती आणि शेतकरी, कृषी क्षेत्राचा विकास हाच ध्यास घेऊन जगणारा नेता म्हणजे हरीभाऊ.आदर्श विचारांचा आणि कर्तुत्वाचा वारसा म्हणजे हरीभाऊ असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.

माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंती निमित्ताने भालोद येथे व्हर्चुअल आणि ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन स्व.कृषीमित्र हरीभाऊ जावळे विचारमंचाच्या माध्यमातून करण्यात आले होते.या कार्यक्रमात केंद्रातील आणि राज्यातील आजी माजी मंत्री ऑनलाईन सहभागी झाले आणि याच माध्यमातून सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे या व्हर्चुअल आणि ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला पुष्पहार अर्पण करून सुरवात करण्यात आली.व्यासपीठावर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महराज, भक्ती प्रकाशदास शास्त्रीजी , सुरेश शास्त्री मानेकर बाबा, शशिकांत महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक शशिकांत गाजरे यांनी केले. सूत्रसंचालन जतीन मेढे यांनी तर आभार भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी मानले.

यावेळी मान्यवरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ज्यानी राजकारणात सुद्धा कटुता निर्माण केली नाही असे निगर्वी आणि संयमी नेता म्हणजे हरीभाऊंच्या नावाने येणाऱ्या काळात संस्था तयार करून मोठ काम त्या माध्यमातून करण्याचे आम्ही ठरवलेल आहे असे माजी खा. उल्हास पाटील यांनी नमूद केले. दुरदृष्टीने काम करणारा नेता म्हणजे हरीभाऊ. यावल रावेर भागातील सिंचनाच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा त्यांनी केला.शेळगांव आणि मेगा रिचार्ज साठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहतील असे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी म्हटले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि,माणसांमधे माणसाळलेला साधा माणूस म्हणजे हरीभाऊ. पक्षाची उंची वाढवणारा नेता म्हणजे हरीभाऊ. केळीला फळाचा दर्जा मिळावा म्हणून भाऊंनी सातत्याने पाठपुरावा केला.आपण सर्व मिळूनही भविष्यात याच गोष्टीचा पाठपुरावा केल्यास भाऊंना ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी, हरीभाऊंनी स्वताच्या कष्टाने आणि मेहनतीने पक्षात स्वतःचे स्थान निर्माण केले.भाऊंना पाण्याविषयी आणि शेतकऱ्यांन विषयी तळमळ होती. हार जित झाली किवा खासदारकीच तिकीट कापल्या गेल पण ते आजपर्यंत पक्षाच्या विरोधात कधीही बोलले नाही. त्यांच्या जाण्याने पक्षाच खुप मोठ नुकसान झालय, असे सांगितले.

केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी, प्रत्येकाला सन्मानाने वागवणारे आणि सातत्याने विकासाच्या चर्चा करणारे हरीभाऊ कायमच स्मरणात राहतील. माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी, भाऊंनी केळी विषयाला वाहून घेतल होत.लोकांच्या प्रश्नासाठी भांडणारे, मतदारसंघाची जपणूक करणारे हरीभाऊ कायमच स्मरणात राहतील.शेती, माती, पाणी आणि केळी साठीच त्यांच योगदान पुढच्या पिढीला आवर्जून सांगितले पाहिजे.

कार्यकर्ता म्हणून जगलेला, कधीही श्रेयवादात न अडकलेला शुद्ध सात्विक आणि संयमी नेता म्हणजे हरीभाऊ असल्याचे राजेंद्र फडके यांनी म्हंटले.
पक्षाशी एकनिष्ठ, कटीबद्ध, पक्षावर श्रद्धा असणारे नम्र , मिलनसार, कार्यकर्त्यांसाठी आदर्श म्हणजेच हरीभाऊ. त्यांचे अचानक जाणे दुर्भाग्यपुर्ण असेच आहे. त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.त्यांचे कार्य, आदर्श विचारधारा आपल्याला कायमच दिशादर्शक ठरतील असे मंत्री नितीन गडकरी सांगितले.

माणसातला देव माणूस म्हणजे हरीभाऊ असे जनार्दन हरीजी महाराज यांनी नमूद केले. शरीराने हरीभाऊ आपल्यात नसले तरी कर्तव्याच्या माध्यमातून ते आपल्यात कायम जिवंत असतील असे भक्तीप्रकाश शास्त्री यांनी नमूद केले. राजकारणाच्या चिखलात राहूनही कमळासारखे स्वच्छ चारित्र्यवान नेते म्हणजे हरीभाऊंच्या वागण्यात आणि बोलण्यात साधेपणा होता, ते कायमच संताचा आदर करत.भाऊ त्यांच्या विचारांनी कायमच आपल्या सोबत असतील आणि आम्ही सर्व संत मंडळी कायमच त्यांच्या परीवारा सोबत आहोत असे सुरेश शास्त्री मानेकर बाबा यांनी सांगितले. आपण सर्वांनी या कठीण काळात जे प्रेम आणि सहकार्य केले, त्याची उतराई होण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात मी नक्कीच करणार आहे असे अमोल जावळे यांनीम्हंटले. या प्रसंगी रावेर यावल तालुक्यासह जिल्ह्यातील भाजपाचे आणि इतर पक्षीय सर्व जेष्ठ श्रेष्ठ लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Previous Post

व्यापाऱ्याच्या लुटीप्रकरणी तिघा संशयितांना रंगेहात पकडले ; पहूर-जांभूळ रस्त्यावरील घटना

Next Post

 रडूबाई रडू अन कोपऱ्यात बसू, हे सोडा आता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

 रडूबाई रडू अन कोपऱ्यात बसू, हे सोडा आता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!
1xbet russia

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ
1xbet russia

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon