गाजीपूर (वृत्तसंस्था) – उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. तीन पाय असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या घटनेने सर्वच हैराण झाले असून बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. अनेकांनी हा दैवी चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. तर काही जण मुलाच्या पाया पडण्यासाठी घरी मोठी गर्दी करत आहेत. तीन पायांचं बाळ पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. सर्वत्र फक्त या बाळाचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्यातील तियरा गावात ही घटना घडली आहे. तियरा गावात राहणाऱ्या प्रियंका देवी यांनी 29 सप्टेंबर रोजी तीन पायांच्या बाळाला जन्म दिला. मुलाचा तिसरा पाय त्याच्या गुप्तांगाशी जोडला गेलेला आहे. या पायाला सहा बोटे आहेत. मुलाचं आरोग्य उत्तम असून ते सामान्य बाळासारखं आहे. तीन पायांचं बाळ हा सध्या सर्वत्र कुतुहलाचा विषय झाला आहे.







