जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रूग्णालयात दोन उपअधिष्ठात्यांसह वैद्यकीय अधिक्षकांची अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी नियुक्ती केली आहे.
डॉ.दत्तात्रय बिराजदार यांची उदगाव जिल्हा लातूर येथे बदली झाल्यामुळे वैद्यकिय अधिक्षक पदाचा भार डॉ.इम्रान पठाण यांच्याकडे होता.त्यामुळे 1 ऑक्टोंबरपासून वैद्यकिय अधिक्षक म्हणून वैभव सोनार यांची नियुक्ती डॉ.रामानंद यांनी केली.तसेच उपअधिष्ठाता (पदव्यूत्तर)पदी डॉ.मारोती पोटे तर उपअधिष्ठाता (पदवीपूर्व) पदी डॉॅ.किशोर इंगोले यांची नियुक्ती डॉ.रामानंद यांनी केली आहे.यामुळे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येवून पारदर्शक कारभार करण्यास गती येईल अशी माहिती डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी केसरीराज शी बोलतांना दिली.







