जळगाव जिल्ह्यात कोरोनापासून दिलासा
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आतापर्यंत 39 हजार 631 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.72 टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या 7 हजार 101 ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी 2 हजार 405 रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत 2 लाख 2 हजार 546 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याने गेल्या बारा दिवसांपासून सलगपणे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 3 हजारने कमी झाली आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपापयोजना राबविण्यात येत आहे. पालकमंत्र्यांच्या आवाहनाला लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी उत्सफुर्तेपणे प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून लक्षणे जाणवताच नागरीकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे 93 हजार 511 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 1 लाख 9 हजार 35 अशा एकूण 2 लाख 2 हजार 546 तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 52 हजार 655 चाचण्या निगेटिव्ह तर 47 हजार 907 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 114 असून 870 अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात सध्या 7 हजार 101 बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 3 हजार 513 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 651, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 532 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 2 हजार 405 रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षातही 328 रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले 5 हजार 918 रुग्ण असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 183 इतकी आहे. यापैकी 631 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 208 रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे.
जिल्ह्यात आज एका दिवसात 261 पॉझिव्टिह रुग्ण आढळल्याने आतापर्यतच्या बाधित रुग्णांची संख्या 47 हजार 907 इतकी झाली आहे. यापैकी 39 हजार 631 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात एका दिवसात 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 1 हजार 175 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 2.45 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये 12 हजार 854 इतके बेड आहेत. यात 322 आयसीयू बेड तर 2 हजार 19 ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47 हजार 907 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 10835, जळगाव ग्रामीण 2373, भुसावळ 3281, अमळनेर 4118, चोपडा 4025, पाचोरा 1813, भडगाव 1786, धरणगाव 2103, यावल 1597, एरंडोल 2738, जामनेर 3290, रावेर 1992, पारोळा 2405, चाळीसगाव 3121, मुक्ताईनगर 1286, बोदवड 771, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 374 रुग्णांचा समावेश आहे.
जळगाव शहर 8719, जळगाव ग्रामीण 1613, भुसावळ 2323, अमळनेर 3750, चोपडा 3231, पाचोरा 1660, भडगाव 1620, धरणगाव 1864, यावल 1401, एरंडोल 2054, जामनेर 2834, रावेर 1487, पारोळा 2059, चाळीसगाव 2905, मुक्ताईनगर 1210, बोदवड 626, इतर जिल्ह्यातील 275 याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 32 हजार 941 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले 7 हजार 101 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये जळगाव शहर 1870, जळगाव ग्रामीण 682, भुसावळ 823, अमळनेर 271, चोपडा 722, पाचोरा 83, भडगाव 125, धरणगाव 190, यावल 137, एरंडोल 639, जामनेर 387, रावेर 417, पारोळा 328, चाळीसगाव 146, मुक्ताईनगर 47, बोदवड 135, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 99 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यत उपचारादरम्यान 1 हजार 175 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये जळगाव शहर 246, जळगाव ग्रामीण 78, भुसावळ 135, अमळनेर 97, चोपडा 72, पाचोरा 70, भडगाव 40, धरणगाव 49, यावल 59, एरंडोल 45, जामनेर 69, रावेर 88, पारोळा 18, चाळीसगाव 70, मुक्ताईनगर 29, बोदवड 10 मृतांचा समावेश आहे. उपचारादरम्यान एकूण मृत्यु झालेल्या 1 हजार 175 रुग्णांपैकी 1029 मृत्यु हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील असून 530 मृत्यु हे आजारपण असलेले आहेत.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 204 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 2 हजार 418, शहरी भागातील 1 हजार 312 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 1 हजार 474 ठिकाणांचा समावेश आहे. या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी 6 हजार 502 टिम कार्यरत आहे. या क्षेत्रात 2 लाख 56 हजार 350 घरांचा समावेश असून यात 11 लाख 18 हजार 37 इतकी लोकसंख्येचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.