जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक फार्मासिस्ट (औषधनिर्माता) दिवसानिमित्त त्रिमूर्ती इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी जळगाव तर्फे त्रिमूर्ती कोरोना योद्धा सम्मान युवाशक्ती फौंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांना त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रांजळ घोलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कावडीया यांनी मागील ६ महिन्यात शिवसेना जळगाव व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे लॉकडाऊन काळात जळगावकर नागरिकांसाठी सामाजिक व आरोग्यदायक कार्य केले. त्याकरिता सदर पुरस्कार देऊन त्यांचे सन्मान करण्यात आले.