• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 75 टक्क्यांवर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2020
in जळगाव
0

जिल्ह्यात 33 हजार रुग्णांची कोरोनावर मात ;

कोरोनाच्या एक लाख 84 हजार चाचण्या पूर्ण

उपचार घेत असलेल्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 9860

यात लक्षणे नसलेल्या 8384 रुग्णांचा समावेश

जळगाव(प्रतिनिधी) – जिल्ह्यात एकाच दिवसात (20 सप्टेंबर) 605 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 32 हजार 941 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.04 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 9 हजार 860 ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी 3 हजार 494 रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत 1 लाख 83 हजार 808 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपापयोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली असून लक्षणे जाणवताच नागरीकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे 86 हजार 926 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 96 हजार 882 अशा एकूण 1 लाख 83 हजार 808 तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 38 हजार 63 चाचण्या निगेटिव्ह तर 43 हजार 897 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 88 असून 760 अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात सध्या 9 हजार 860 बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 4 हजार 890 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 807, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 669 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 हजार 494 रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षातही 438 रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले 8 हजार 384 रुग्ण असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 476 इतकी आहे. यापैकी 669 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 287 रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे.
जिल्ह्यात आज एका दिवसात 596 पॉझिव्टिह रुगण आढळल्याने आतापर्यतच्या बाधित रुग्णांची संख्या 43 हजार 897 इतकी झाली आहे. यापैकी 32 हजार 941 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आज एका दिवसात 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 1 हजार 96 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 2.50 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये 12 हजार 854 इतके बेड आहेत. यात 263 आयसीयू बेड तर 1 हजार 643 ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत आढळून आलेले बाधित रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 43 हजार 897 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 9814, जळगाव ग्रामीण 2238, भुसावळ 2689, अमळनेर 3836, चोपडा 3686, पाचोरा 1707, भडगाव 1698, धरणगाव 1951, यावल 1447, एरंडोल 2623, जामनेर 3099, रावेर 1808, पारोळा 2235, चाळीसगाव 2844, मुक्ताईनगर 1180, बोदवड 708, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 334 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या
जळगाव शहर 6799, जळगाव ग्रामीण 1431, भुसावळ 1898, अमळनेर 3030, चोपडा 2409, पाचोरा 1539, भडगाव 1491, धरणगाव 1552, यावल 1162, एरंडोल 1846, जामनेर 2396, रावेर 1320, पारोळा 1709, चाळीसगाव 2495, मुक्ताईनगर 1122, बोदवड 524, इतर जिल्ह्यातील 218 याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 32 हजार 941 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय उपचार घेत असलेल्या (ॲक्टिव्ह) रुग्णांची संख्या
जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले 9 हजार 860 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये जळगाव शहर 2786, जळगाव ग्रामीण 733, भुसावळ 669, अमळनेर 716, चोपडा 1209, पाचोरा 102, भडगाव 167, धरणगाव 353, यावल 233, एरंडोल 736, जामनेर 637, रावेर 406, पारोळा 509, चाळीसगाव 282, मुक्ताईनगर 32, बोदवड 174, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 116 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या
जिल्ह्यात आतापर्यत उपचारादरम्यान 1 हजार 96 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये जळगाव शहर 229, जळगाव ग्रामीण 74, भुसावळ 122, अमळनेर 90, चोपडा 68, पाचोरा 66, भडगाव 40, धरणगाव 46, यावल 52, एरंडोल 41, जामनेर 66, रावेर 82, पारोळा 17, चाळीसगाव 67, मुक्ताईनगर 26, बोदवड 10 मृतांचा समावेश आहे. उपचारादरम्यान एकूण मृत्यु झालेल्या 1 हजार 96 रुग्णांपैकी 956 मृत्यु हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील असून 508 मृत्यु हे आजारपण असलेले आहेत.
जिल्ह्यातील 5 हजार 22 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 22 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 2 हजार 279, शहरी भागातील 1 हजार 280 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 1 हजार 463 ठिकाणांचा समावेश आहे. या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी 6 हजार 236 टिम कार्यरत आहे. या क्षेत्रात 2 लाख 54 हजार 476 घरांचा समावेश असून यात 11 लाख 10 हजार 910 इतकी लोकसंख्येचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर कोविड-19, जळगाव यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.


 

 

Previous Post

पाचोरा येथे ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या जनजागृती अभियानाची सुरुवात

Next Post

जळगाव जिल्ह्यात महात्मा फुले ब्रिगेडच्या योजनांची सुरुवात – जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात महात्मा फुले ब्रिगेडच्या योजनांची सुरुवात - जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon