पारोळा/चोरवड (प्रतिनिधी) – चोरवड येथील माने बंधूकडून गावाला शव पेटी लोकार्पण करण्यात आली. सुर्यकांत शिवदास पाटील यांचे स्मरणार्थ तसेच आ. चिमणराव पाटील आणि सरपंच मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षक संदेश माने व तलाठी निशिकांत माने यांचेतर्फे शवपेटी देण्यात आली.

चोरवड गावी यापुर्वी शवपेटी मिळत नसल्याने शेजारी गावातुन शवपेटी मागवावी लागत होती. याची जाणिव ठेऊन व आपल्या वडीलांचा समाजसेवेचा वसा चालु ठेवत शवपेटी देऊन माने बंधूंनी आपले दातृत्व सिध्द केले आहे. शवपेटी चे लोकार्पणप्रसंगी जि.प. सदस्य डाॅ हर्षल माने, माजी सरपंच प्रकाश पाटील, विनोद माने, दिपक पाटील, मधुकर पाटील, राकेश माने, उल्हास माने, बबलु माने, महेंद्र सुतार, अशोक पाटील, आबा गोरख पाटील, भालेराव पाटील, जगदीश पाटील, मल्हार कुंभार, रूपा मोरे, प्रविण मोरे, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, अतुल भाटीया, निंबा रतन पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.







