जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रस्ते शास्त्रीय पद्धतीने दुरुस्त केली पाहिजेत, याबाबत महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाचा सल्ला घेऊन रस्ते तयार केले तर ते अनेक वर्ष सहज टिकतील. मात्र मनपा प्रशासन केवळ पोकळ डागडुजीच्या मागे लागली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे महानराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केले आहे.
जळगाव महानगरपालिका रस्ते दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करीत आहेत. मात्र तयार केलेल्या रस्त्यांची गुणवत्ता चांगली नसल्याने रस्ते लगेच खराब होतात. वाहनधारकांसह नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. पावसाळ्यामध्ये रस्त्यांची स्थिती आणखीनच बिकट होत आहे. याकरिता कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.


निवेदनात पुढे म्हंटले आहे की, महत्वाच्या रहदारीच्या रस्त्यावर पडणारे खड्डे शास्त्रोक्त पद्धतीने भरले जाऊ शकतात. मागीलवर्षी मी स्वतः सिमेंटचे पेव्हरब्लॉक टाकून खड्डे व्यवस्तीत भरले होते. हे खड्डे आजही सुस्थितीत आहे. राष्ट्रीय महामार्गावर देखील मोठे खड्डे भरायला पेव्हरब्लॉक वापरतात. डांबराने खड्डे नीट दुरुस्त होत नाहीत. व पुन्हा खड्डे पडतात यासाठी प्रमुख रस्त्यावरील खड्डे पेव्हरब्लॉकने भरावे, व लहान खड्डे काँक्रीटने भरून त्यावर रोलिंग केले तर टिकू शकतात. यासाठी मनपाने दुरुस्तीचे एकाच टेंडर तीन वर्षासाठी काढावेत. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शन घ्यावेत. एकदा टेंडर दिले की, रस्ता दुरुस्ती,देखभालीचे काम त्याच ठेकेदाराचे राहील व जनतेचा पैसा देखील वाचेल. असेही अभिषेक पाटील यांनी म्हंटले आहे.







