जळगाव (विशेष प्रतिनिधी) – जळगाव येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रभाषा हिंदी दिवस म्हणून ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला.

यावेळी पोद्दार स्कुलचे प्राचार्य गोकूळ महाजन यांनी पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, सन्माननीय पालक, विद्यार्थी तसेच उपस्थितांचे स्वागत शब्दसुमनांनी केले. तसेच शाळेत कार्यरत असलेल्या हिंदी विषय शिक्षकांना त्यांच्या ज्ञानाजेनांच्या समर्पित सेवेसाठीचे गौरव पत्र तसेच पुष्पगुच्छ देवून त्यांना सन्मानित केले.जॉयस मॅथिव या विद्यार्थ्याने या प्रसंगी हिंदी भाषेचे महत्व विषद केले. तसेच कु.योषा गांधी हिने हिंदी कविता सादर केली.यावेळी उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
शाळेचे उपप्राचार्य रूपेश घाटगे, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे, वरिष्ठ समन्वयक दिपक भावसार, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपीका गुजराथी यांनी केले. तर आभार वैशाली महाजन यांनी केले.







