मुंबई (वृत्तसंस्था)- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. पण त्याच्या निधानानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना सोशल मीडियावर घराणेशाही वरून चांगलाच टीकेचा सामना करावा लागतो आहे.
याच मुद्यावरून आता खासदार जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या, ‘मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत नावं कमावली, त्यांना गटार म्हटलं जातंय. माझा याला पूर्ण विरोध आहे.
त्या पुढे म्हणाल्या, ‘लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही.’