मनवेल ता.यावल (प्रतिनिधी) – साकळी – मनवेल रस्त्याचे तीन महीन्यापुर्वी डांबरीकरण करण्यात आले. मात्र रस्त्यावर साईड पट्यांच्या जागी मुरुम न टाकण्यात आल्यामुळे रस्त्याचे दोन्ही बाजुला वाढलेले गवताच्या झुडपा येथील तरुणाने स्वतः विळ्याने कापल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साकळी गावापासुन तर शिरागड गावापर्यत 11 कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र रस्त्याचे साईड पट्या भरण्यात आल्या नसल्यामुळे रस्त्याचे दोन्ही बाजु काटेरी झुडपे व गवत वाढले असल्यामुळे वळण रस्त्यावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघात वाढत असुनही ठेकेदार साईड पट्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे.
या रस्त्यावर दोन मोटार सायकलच्या समोरासमोर आल्यावरच एक महिन्यांपुर्वी अपघात झाला होता.यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
येथील किरण प्रकाश पाटील या युवकाने स्वतः अपघाती जागेवरील वाढलेली झुडपे कापल्याने वाहन धारकांना दिलासा दिला असुन त्याने दोन्ही बाजुची झुडपे कापल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
साकळी ते मनवेल या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. यात वळण रस्त्यावर साईड पट्यांच्या कामाकडे ठेकेदार यांना वांरवार कडुन ही दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहन धारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.