जळगाव (प्रतिनिधी)- येथील महापालिकेच्या सफाईचा ठेका घेतलेल्या वॊटरग्रेस कंपनीच्या ठेकेदाराचे पाच ट्रॅक्टर उपप्रादेक्षिक परिवहन अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.
गेल्या दोन दिवसापासून महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराच्या ट्रॅक्टरमध्ये माती व झाडे भरली जात असून वजन वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरध्यक्ष अभिषेक पाटील यांनी उघड केली होती. हे ट्रॅक्टर विना क्रमांकाचे असल्याचेही दिसून आले होते. दरम्यान सोमवारी आरटीओचे अधिकारी सचिन बुरुड यांच्या पथकाने आरटीओ कार्यालयाने विना नंबर आणि कागदपत्रांच्या अपूर्णतेअभावी ट्रॅक्टर जमा केले. आणि ते नेरिनाका येथील शासकीय जागी ठेवले आहेत. या कारवाईला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी दुजोरा दिला आहे.