नवी दिल्ली (वृत्तसंस्था )- ज्या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पोलिसांनी एका मुलीची सुटका केली होती. त्या अपहरणकर्त्यानींच पोलीस ठाण्यात आलेल्या महिला हवालदाराला कोंडून ठेवत त्यांनी मुलीला पळवले होते. या मुलीला पोलीस ठाण्यातून पळवणार्यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं उघड झाले आहे. किमान 6 जणांनी अनेक दिवस तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. मअवघरफ पोलीस ठाण्याच्या या महिला हवालदाराला आणि तपास अधिकार्याला मुलगी पोलीस ठाण्यातून बेपत्ता झाल्याने निलंबित करण्यात आले. दि. 21 ऑगस्ट रोजी या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायदंडाधिकार्यांसमोर जबाब नोंदवायला जाण्यापूर्वीच ही मुलगी पोलीस ठाण्यातून बेपत्ता झाली. या मुलीच्या तक्रारीनंतर 12 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून मुख्य आरोपी लवकुश हा 20 वर्षांचा असून तो खासगी कंपनीत नोकरीला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील इटाह पोलीस ठाण्यातून 21 ऑगस्ट रोजी एक मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. या मुलीची पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून पोलीस ठाण्यात आणली होती. मुलीला पळवून नेणार्यांनी तिला दिल्ली आणि आसपासच्या परिसरात फिरवत ठेवले होते. या मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलंय की, मुलगी पहिल्यांदा 14 ऑगस्टला बेपत्ता झाली होती. तिचा बराच वेळ शोध घेतल्यानंतर ती जवळच्याच एका गावात सापडली होती. मात्र तोपर्यंत अपहरणकर्ते फरार झाले होते. मुलीच्या आईवडिलांनी म्हटलंय की लवकुश नावाच्या एका तरूणाचं या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे. त्याने मुलीला लग्नाची मागणी घातली होती, मात्र ती धुडकावून लावल्याने त्यानेच मुलीचा अपहरण केल्याचे पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले.