मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना बाधितांची संख्या 38 वर पोहोचली आहे. तर देशात 110 जण कोरोनाबाधित आहेत. याबाबत राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे.राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत, नगर पालिका निवडणुका 3 महिन्यासाठी पुढे ढकलण्याची शिफारस निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. या बाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.दरम्यान राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद 31मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. तसेच महाविद्यालय आणि विद्यापीठातील परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहे. मात्र 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच कोरोनासाठी आर्थिक निधी सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. कोणत्या शहरात किती कोरोना बाधित? पुणे 16 मुंबई 8 नागपूर 4 यवतमाळ 3 नवी मुंबई 2 ठाणे 1 कल्याण 1 पनवेल 1 अहमदनगर 1 औरंगाबाद 1