मुंबई (वृतसंस्था)- कंगना राणावत सध्या सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे. नुकतीच ‘मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची’ उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर कंगनावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. आता शिवसेना नेते व आमदार प्रताप सरनाईक यांनीही कंगनावर निशाणा साधला.

प्रताप सरनाईक म्हणाले कि, कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे, अशा कडक शब्दात त्यांनी कंगनाला सुनावले आहे.







