जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील शिवाजीनगर परिसरातील अमर चौक भागातून विनापरवाना वाळू वाहतूक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर शुक्रवारी सकाळी ११ वाजता शहर पोलिसांना पकडले असून ट्रॅक्टर चालकाविरूध्द कारवाई करण्यात आली आहे.
शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संजय झाल्टे यांच्यासह काही कर्मचारी शिवाजीनगर परिसरातील अमर चौक भागात गणेशोत्सव बंदोबस्त ड्युटी करित होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांना विना क्रमांकाचे वाळू वाहतूक करित असलेले ट्रॅक्टर दिसून आले.
पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून विचारपूस केली असता चालकाने दत्तात्रय प्रभाकर साळुंखे (२०, रा. आव्हाणा, ता. जळगाव) असे त्याचे नाव सांगितले़ पोलिसांना त्याला वाळू वाहतूकीचा परवाना मागितला असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी ट्रॅक्टर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात जमा केले असून ट्रॅक्टर चालकाविरूध्द कारवाई केली आहे.