चाळीसगाव;- तालुक्यातील वाघडू शिवारातील शेतात असलेल्या झोपडीला रात्री वेळी आग लागून यात देवराम नंदराम पाटील (वय ७०) यांचा जळून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
देवराम पाटील हे गेल्या पंधरा वर्षांपासून शेतातच झोपडीत राहत होते. रात्री थंडी असल्याने शेकोटी केल्यामुळे या शेकोटीची आग झोपडीला लागल्याने ही झोपडी जळून खाक झाली असून यात देवराम पाटील यांचा मृत्यू झाले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, घटनास्थळी चाळीसगाव चे पोलीस पथक पोहोचले असून पंचनामा करण्यात आला असून याची नोंद करण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .