जळगाव (प्रतिनिधी) – कुसुंबा खुर्द येथील श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संस्थाध्यक्ष मनोजकुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनातुन कोरोना विषाणू (kovid-19) ,प्रसार,बचाव या विषयावर विद्यार्थाना मार्गदर्शन करण्यात आले.शिक्षकांनी विद्यार्थाना प्रशासनाने सुट्टी जाहीर करण्यापुर्वी घरी काळजी कशी घ्यावी याबाबत प्रात्यक्षिके सादर केली.त्या मध्ये हात स्वच्छ धुन्याच्या पध्दती ,शित पध्दतीचे पदार्थ खाणे टाळणे,गरदीच्या ठिकाणी जाणे टाळणे, खोकलत्या वेळी घायची काळजी व सर्दी,खोकला व ताप आढळल्यास वैद्यकीय मदत घेणे.या विषयी जनजाग्रुती करण्यात आली.या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु प्रतिक्षा पाटील मँड्म व शिक्षक वृंद उपस्थिति होते.