• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातल्या कोविड केअर सेंटरमध्ये झिंगाट नाच

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – कोरोनाचा निर्भयपणे प्रतिकार करतांना किती विलक्षण सकारात्मकता ठेवता येते हे भुसावळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दिसून आले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातल्या कोविड केअर सेंटरमध्ये पॉझिटीव्ह रूग्ण फावल्या वेळेत धमाल नृत्य करत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचे वेळीच निदान होऊन उपचार झाल्यास यावर मात करता येत असल्याचा संदेश या सर्वांनी दिला आहे.

भुसावळ तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणार्‍यांचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान, शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांमध्येही सकारात्मकता वाढीस लागल्याचे दिसून आले आहे.

भुसावळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये कोविड केअर सेंटर असून येथून बरेच रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या येथे उपचार सुरू असणार्‍या रूग्णांमध्ये अगदी बालकांपासून ते वृध्दांपर्यंतचा समावेश आहे. येथे प्रशासनातर्फे चांगली सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात पौष्टीक अन्नापासून ते प्रसन्न वातावरणाचा समावेश आहे.

दरम्यान, प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधेला रूग्णांनीही अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येथील रूग्णांनी आज तर चक्क गाण्यांवर ताल धरून बहारदार नृत्य केले. विशेष बाब म्हणजे कोरोनाशी संबंधीत असणार्‍या गाण्यांवरच पॉझिटीव्ह रूग्ण थिरकले.

या संदर्भात उपचार घेत असलेले एक प्रौढ रूग्ण म्हणाले की, कोरोनाचे योग्य निदान होऊन वेळीच उपचार झाल्यास या विषाणूवर यशस्वीपणे मात करता येते. यामुळे कुणीही मनात भिती न बाळगता उपचार घेऊन कोरोनामुक्त व्हावे असे ते म्हणाले. प्रशासनाने चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

भुसावळचे नगरसेवक तथा कोरोनाच्या आपत्तीमध्ये लोकांच्या अडी-अडचणीत धावून जाणारे नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी हे नियमितपणे या कोविड केअर सेंटरला भेट देत असून रूग्णांचा हौसला वाढविण्याचे काम करत असतात. आज ते आले असतांनाच येथे नृत्य सुरू होते. याबाबत कोठारी म्हणाले की, काळजी घेतली तर कोरोना हा साध्या आजाराप्रमाणे असून कुणीही यावर मात करू शकते.

भुसावळकर हे अतिशय जिंदादिल म्हणून ओळखले जातात. येथील नागरिकांचा हा जीवंतपणा आणि उर्जा कोरोनाचा उपचार घेतांनाही दिसून आली आहे. यामुळे भुसावळच्या कोविड केअर सेंटरमधील बहारदार नृत्य चर्चेचा विषय बनले आहे.


 

 

Previous Post

महावितरणकडून राज्यातील लघु उद्योजकांची लुबाडणूक – श्यामसुंदर अगरवाल

Next Post

चाळीसगाव येथे स्व. हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ट्रामा केयर सेंटर येथे वृक्षारोपण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव येथे स्व. हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ट्रामा केयर सेंटर येथे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
1xbet russia

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon