पाचोरा (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद मराठी शाळा राजुरी बुद्रुक केंद्र वरखेडी तालुका पाचोरा येथे रोटरी क्लब पाचोरा यांचेमार्फत नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी वृक्षारोपणाला रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉ. प्रशांत पाटील ,सचिव रो. डॉ. अमोल जाधव, रोटरी क्लबचे श्री शिवाजी शिंदे सर श्री निलेश कोटेचा, तसेच पिंपळगाव जि. प.गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे हे उपस्थित होते.
वृक्षारोपणासाठी यावर्षी झाडे उपलब्ध नसल्यामुळे रोटरी क्लब यांनी जिल्हा परिषद राजुरी शाळेस दोन हजार रुपये किमतीची 50 झाडे तसेच ग्रामपंचायत राजुरी यांनी पंधराशे रुपये किमतीची.२०झाडे. शाळेस भेट दिलेली होती. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ७० रोपांची लागवड राजुरी जि प शाळेच्या परिसरात करण्यात आली . या वृक्षारोपण प्रसंगी रो.रुपेश शिंदे,रो.पवन अग्रवाल, रो. गोरख महाजन, रो. मुकेश तेली. रो. रोहन पाटील, रो.डॉ.पवन पाटील,राजुरी गावचे प्रथम नागरिक सरपंच वैशालीताई पाटील, माजी सरपंच निर्मलाताई पाटील, शोभा ताई पाटील, उपसरपंच श्रीकांत पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल पाटील आणि सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच नंदकिशोर पाटील, पोलीस पाटीलताई सो मनीषा उभाळे आणि जिल्हापरिषद राजुरी शाळा यांचे मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत तसेच सहकारी श्री ज्ञानेश्वर पाटील व श्रीमती नूतन चौधरी आणि बी.आर.सी. पाचोरा येथील विषय तज्ञ श्रीमती वनिता जीकाटे मॅडम सर्व उपस्थित होते.
रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.श्री प्रशांत पाटील यांनी काळातही शाळा बंद असले तरी शाळेचे प्रशस्त आवार व परिसरातील स्वच्छता व नीटनेटके पाहून शिक्षकवृंद व ग्रामस्थ यांचे खूप कौतुक केले. मात्र विद्यार्थ्यांविना शाळा सुनी वाटते ही खंत देखील व्यक्त केली. शाळेच्या प्रगतीसाठी नेहमी पुढे असणारे राजुरी गावचे विश्वस्त श्री अनंतराव पाटील तसेच माजी पोलीस पाटील यशवंतराव पाटील आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य अनमोल आहे. याची जाणीव मुख्याध्यापिका यांनी करून दिली.








