• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दैनंदिन चाचण्या करण्यामध्ये जळगाव जिल्हा राज्यात 11 व्या स्थानी – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाच्या गेल्या चोवीस तासात सुमारे 2072 इतक्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 63 हजार 146 व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण दहापटीने वाढले आले आहे. अशी माहितीही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्हाधिकरी श्री. राऊत म्हणाले की, मे अखेरला जिल्ह्यात दैनंदिन 200 व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येत होत्या. परंतु आता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गेल्या दोन महिन्यात तपासणीची साधने वाढल्याने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहे. सद्य:परिस्थितीमध्ये दैनंदिन चाचण्या करण्यामध्ये जळगाव जिल्हा राज्यात 11 व्या स्थानी पोहोचला असून जिल्ह्यात 7 ऑगस्ट रोजी 1911 तर 8 ऑगस्ट रोजी 2072 अशा एकूण 3983 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात रॅपिड ॲटिजेन चाचण्यांची संख्या 2337 तर आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या 1645 इतकी आहे. सध्या राज्यात दैनंदिन सर्वाधिक 12402 चाचण्या नाशिक जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ पुणे, ठाणे, मुंबई, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन दोन हजारापेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असून त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्या केल्याने बाधित रुगण शोधण्यास मदत होत असून कोरोनाची साखळी खंडित करण्यात मदत होणार आहे.

कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्ण शोधण्यास मदत होत असल्याने अशा बाधित रुगणांवर तातडीने उपचार करणे शक्य होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होणाचे प्रमाण वाढण्यास मदत झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर कमी करण्यासही मदत झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत (8 ऑगस्ट) 13 हजार 887 बाधित रुगण आढळून आले असून त्यापैकी 9 हजार 588 इतके रुग्ण म्हणजेच 69 टक्के रुग्ण बरे झाले आहे. तर सध्या जिल्ह्यात फक्त 3 हजार 698 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत 601 बाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वी 12 टक्के असलेला मृत्युदर सध्या केलेल्या विविध उपाययोजनांमुळे 4.32 टक्क्यांवर आणण्यात प्रशासनास यश आल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले.

जिल्ह्यातील नागरीकांना कोरानाला घाबरु नये. परंतु जागरुक राहून कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत आपल्या नजीकच्या रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी. त्याचप्रमाणे बाहेर पडतांना मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.


 

 

Previous Post

किसानमुक्ती दिनाचे औचित्य साधत लोकसंघर्ष मोर्चाचे जळगावात आंदोलन

Next Post

काँग्रेस सेवा फौंडेशनच्या यावल शहर अध्यक्षपदी शेख नईम शेख शरीफ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काँग्रेस सेवा फौंडेशनच्या यावल शहर अध्यक्षपदी शेख नईम शेख शरीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon