• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काश्‍मीर मुद्‌द्‌यावरून इम्रान यांचा भारतविरोधी आकांडतांडव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2020
in भारत, विश्व
0

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) – पाकिस्तान यापुढेही जागतिक व्यासपीठावर काश्‍मीर मुद्दा मांडतच राहील, असे वक्तव्य त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने दुर्लक्ष केले तरी काश्‍मीर मुद्‌द्‌यावरून इम्रान यांचा भारतविरोधी आकांडतांडव कायम राहणार असल्याचे सूचित झाले.

भारताने मागील वर्षी (5 ऑगस्ट) धडक पाऊल उचलताना जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्यामुळे काश्‍मीरवर वाकडी नजर असणाऱ्या पाकिस्तानची अस्वस्थता वाढली. भारताच्या महत्वपूर्ण निर्णयाला एक वर्ष झाल्याच्या दिवशी इम्रान यांनी पाकव्याप्त काश्‍मीरच्या विधानसभेला उद्देशून भाषण केले. काश्‍मीरमध्ये काय चाललेय ते जगातील अनेक नेत्यांना ठाऊक नव्हते. मात्र, पाकिस्तान सरकारच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण जगाने काश्‍मीर मुद्‌द्‌याची दखल घेतली आहे, असा दावा त्यांनी केला.

मी स्वत: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर महत्वाच्या देशांच्या प्रमुखांशी बोललो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. नवा राजकीय नकाशा जारी करण्याच्या पाकिस्तानच्या खोडसाळपणाचेही त्यांनी जोरदार समर्थन केले.

काश्‍मीर आणि गिलगिट-बाल्टीस्तान आपला भाग असल्याचे भारताकडून दाखवले जात आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने नवा नकाशा आणल्याचे त्यांनी म्हटले. त्या नकाशात काश्‍मीर आणि गुजरातच्या जुनागडला पाकिस्तानचे भाग म्हणून दाखवण्यात आले आहे.

दरम्यान, काश्‍मीर मुद्‌द्‌यावर बोलणाऱ्या इम्रान यांनी आधी दिलेल्या कबुलीशी विसंगत भूमिका मांडली. भारताने मागील वर्षी जम्मू-काश्‍मीरविषयी महत्वपूर्ण पाऊल उचलल्यानंतर इम्रान यांनी शक्‍य त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर थयथयाट केला.

मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून थंड प्रतिसाद मिळाल्याची कबुली त्यांनी स्वत:च याआधी दिली होती. त्याचे कारण देताना त्यांनी पाश्‍चिमात्य देशांचे भारतात व्यावसायिक हितसंबंध गुंतले असल्याचे म्हटले होते.


 

 

Previous Post

अयोध्येतील भूमिपूजनानिमित्त अमेरिकेतील भारतीयांचा आनंदोत्सव

Next Post

मुंबईसह कोकणात दमदार मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबईसह कोकणात दमदार मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026
अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
जैन कंपनी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम
जैन कंपनी

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon