• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबईसह कोकणात दमदार मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबई शहरासह पूर्व आणि पश्‍चिम उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. कोकणातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. तर पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरले आहे. रत्नागिरीत काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडे, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. मुंबईसह पूर्व आणि पश्‍चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं असून दृश्‍यमानता कमी झाली आहे.

पालघरमधील दहाणू येथे 12 तासांत विक्रमी 350 मीमी पावसाची नोंद झाली आहेत. तसेच ठाण्यातही 150 मीमी पावसाची नोंद झाली आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले असून पावसाचा जोर अजूनही कायम आहे.

सिंधुदुर्गमधील जनजीवन विस्कळीत

दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील खारेपाटणमधून जाणाऱ्या सुख नदीला पूर आल्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच सुख नदीला पूर आल्याने खारेपाटण बाजारपेठेमध्ये पाणी शिरले. बांद्यातून वाहणारी तेरेखोल नदीलाही पूर आल्यामुळे आळवाडा तसेच बांदा बाजारपेठेतही पाणी घुसले. तर कुडाळ तालुक्‍यातील भांनसाळ नदीला पूर आल्यामुळे अनेकांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.

कोल्हापूरात 23 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलीच बॅटिंग केली असून 24 तासात पंचगंगेच्या पाणीपातळीत चौदा फुटांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दिवसभरत राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात 5 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून धरण 77 टक्के भरलं आहे. पावसाचा जोर वाढल्याने एक राज्यमार्ग तर दोन जिल्हा मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.


 

 

Previous Post

काश्‍मीर मुद्‌द्‌यावरून इम्रान यांचा भारतविरोधी आकांडतांडव

Next Post

जिल्ह्यातील नऊ मंडळाधिकाऱ्यांच्या बदल्या; उपजिल्हाधिकारी यांचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यातील नऊ मंडळाधिकाऱ्यांच्या बदल्या; उपजिल्हाधिकारी यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली
1xbet russia

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon