• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरायलाही हवं – शरद पवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2020
in भारत, महाराष्ट्र
0


मुंबई ;- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत गाडीचं स्टेअरिंग आपल्याकडे असल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर महाविकास आघाडीमध्ये वातावरण तापलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडे महाविकास आघाडीचा रिमोट असल्याचं बोललं जात होतं. मात्र, शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही. तसंच राज्यातील काही नेते सध्या अस्वस्थ दिसत आहेत, असं शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण थोडं फिरलंही पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे.

गेले काही दिवस विरोधकांकडून मुख्यमंत्री मातोश्रीवरच असतात अशी टीका होत आहे. त्यावर पवारांनी आपलं मत व्यक्त केलं. “धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत. प्रशासन घेत नाही. विशेष म्हणजे सर्व सहकाऱ्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम चांगलं आहे. त्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण थोडं फिरलंही पाहिजे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं.

शिवाय, महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही. सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहिल्यानंतर या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे जावं यावर सर्वांचं एकमत झालं,” अशी माहितीही शरद पवार यांनी बोलाताना दिली.

नवा पर्याय नाही, सरकार ५ वर्ष चालणार

सध्या राज्यात कोणताही नवा पर्याय नसल्यामुळे महाविकास आघाडीचं हे सरकार पाच वर्षे चालेल. देवेंद्र फडणवीस हे आता कमालीचे अस्वस्थ झाले असून त्यांना सरकार पाडण्याची घाई झाली आहे. परंतु सद्यस्थितीत निवडणूक कोणालाही नको, असं शरद पवार म्हणाले.

अजित पवारांची फिल्डपेक्षा मंत्रालयात अधिक गरज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची मंत्रालयात अधिक गरज आहे. आरोग्यममत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना बाहेर फिल्डवर काम करण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले. त्याचबरोबर, अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे, असंही पवारांनी स्पष्ट केलं.


 

 

Previous Post

रतन टाटा, मुकेश अंबानी यांसह १० उद्योगपती अयोध्येत भूमिपूजनाला लावणार हजेरी

Next Post

भारत बायोटेकची लस नागपूरमध्ये तिघांना दिली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारत बायोटेकची लस नागपूरमध्ये तिघांना दिली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली
1xbet russia

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 6, 2026
जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी
1xbet russia

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

June 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon