• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धरणगावात १०० खाटांचे अद्ययावत उपजिल्हा रूग्णालय उभारणार – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2020
in जळगाव
0

जळगाव(प्रतिनिधी) – धरणगाव येथे लवकरच अद्ययावत उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार असून येथे १०० ऑक्सीजनयुक्त खाटांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल.अशी महत्वपूर्ण घोषणा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धरणगाव येथे आयोजित अत्याधुनीक कार्डियाक रूग्णवाहिकेचे लोकार्पण करतांना ते बोलत होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज धरणगावात कार्डियाक रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात धरणगाव ग्रामीण रूग्णालयाच्या बळकटीकरणासाठी सढळ हाताने मदत करणार्‍या दात्यांचा गौरव पालकमंत्र्यांचा हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गुलाबराव वाघ म्हणाले की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अविरत प्रयत्नांमुळे धरणगावात चांगल्या प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. येथे अगदी ४ वर्षाच्या बालकापासून ते ८४ वर्षाच्या वृध्दापर्यंतच्या रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, एका रूग्णाला जळगावच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्याची वेळ आली तेव्हा रूग्णवाहिका वेळेत उपलब्ध न होवू शकल्याने येथे अद्ययावत रूग्णवाहिका नागरिकांसाठी ना.गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिली आहे. तर काही दिवसांपूर्वीच स्वर्गरथाचे लोकार्पणही करण्यात आले असल्याने धरणगावकरांच्या सेवेत दोन सुविधा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पूर्ण केल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

याप्रसंगी आपल्या मनोगतात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगावात स्वर्गरथ आणि रूग्णवाहिका यांची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. शहरात आधी शिवसेनेची एक आणि १०८ क्रमांकाची शासकीय एक अशा दोन रुग्णवाहिका असून आता अत्याधुनिक कार्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. याच्या मदतीने गंभीर रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होणार आहे. धरणगावात अत्याधुनीक असे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार असून येथे १०० बेडची व्यवस्था असेल. जेणेकरून धरणगावातील रूग्णांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन.एस. चव्हाण यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले. तसेच येथील ग्रामीण रूग्णालयासाठी एनआरएचएमच्या माध्यमातून एक कोटी निधीतून नवीन इमारत बांधली जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयात साहित्य सामग्रीसाठी देखील ७० लाखांना निधी प्रदान करण्यात आला असून लवकरच साहित्य उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. तर शहराजवळ एम.आय.डीसी. उभारण्याचा मानस असून शहराच्या आगामी ३० वर्षांची लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेचे नियोजन सुरू आहे.

मतदारसंघातील कान्या- कोपर्‍यात उत्तम दर्जाचे रस्ते तयार असल्याचे ना. पाटील म्हणाले. धरणगाव शहर हे मोठ्या बाजारपेठेचे शहर म्हणून उदयास यावे यासाठी आपले प्रयत्न असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून कार्डियाक या आधुनिक रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, प्रांताधिकारी विनय गोसावी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, संजय पाटील, राजेंद्र महाजन, पी. एम. पाटील , उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, गटनेते पप्पू भावे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, पोलीस निरीक्षक पवन देसले, यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव वाघ यांनी केले. सूत्रसंचालन पी. एम. पाटील व अभिजीत पाटील यांनी केले. तर आभार विनोद रोकडे यांनी मानले.


 

 

Previous Post

पूरग्रस्त आसाम, बिहारमध्ये मदतकार्य वेगाने सुरू

Next Post

भाजप जळगाव जिल्हाध्यक्षपदी आ. राजूमामा भोळे यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजप जळगाव जिल्हाध्यक्षपदी आ. राजूमामा भोळे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon