• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 29, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती


अभियंते व जनमित्र मोठ्या संख्येने सहभागी

जळगाव ( प्रतिनिधी ) – महावितरणच्या अभय योजनेचा लाभ अधिकाधिक थकबाकीदार वीजग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जळगाव शहरात बुधवारी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना अभय योजनेची माहिती देत थकबाकीमुक्त होण्याची संधी साधण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, अतिरिक्‍त जी.टी. महाजन, अनिल पाटील, राजेश नेमाडे, सुरेंद्र उन्हाळे, उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे, दिलीप मराठे यांच्यासह रॅलीत महावितरणच्या जळगाव विभागातील सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनम‍ित्रांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरातील बसस्थानक चौक, कोर्ट चौक, नेहरूनगर, आसोदा रोड, कांचन नगर आणि जुने जळगाव या प्रमुख भागांतून रॅली काढण्यात आली.

रॅलीदरम्यान अभय योजनेचे महत्त्व, योजनेतील सवलती आणि ग्राहकांना मिळणारे आर्थिक फायदे यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. थकीत वीजबिलांचा प्रश्न निकाली काढून वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली.

व्याज व विलंब आकाराला १०० टक्के माफी

१५ जानेवारी २०२७ पर्यंत अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले अकृषी ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले पात्र ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. याशिवाय, १५ डिसेंबर २०२६ पूर्वी मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना थकबाकीच्या कालावधी व ग्राहक वर्गवारीनुसार १० ते २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळणार आहे. मूळ थकबाकी एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा आहे. पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांचे सर्व्हिस कनेक्शन शुल्कही माफ करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कॅप्शन : महावितरणतर्फे अभय योजनेच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी.


 

 

Tags: mahavitran abhya yojna rali
Previous Post

पारोळा बसस्थानका जवळ महिलेच्या हातातील सोन्याची पाटली हिसकावली!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती
खान्देश

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

November 29, 2026
पारोळा बसस्थानका जवळ महिलेच्या हातातील सोन्याची पाटली हिसकावली!
क्राईम

पारोळा बसस्थानका जवळ महिलेच्या हातातील सोन्याची पाटली हिसकावली!

November 29, 2026
यावलमधील दोन सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार!
खान्देश

यावलमधील दोन सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार!

November 29, 2026
भुसावळमध्ये फसवणूक करून ७० हजारांचा ऐवज लंपास!
क्राईम

भुसावळमध्ये फसवणूक करून ७० हजारांचा ऐवज लंपास!

November 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

November 29, 2026
पारोळा बसस्थानका जवळ महिलेच्या हातातील सोन्याची पाटली हिसकावली!

पारोळा बसस्थानका जवळ महिलेच्या हातातील सोन्याची पाटली हिसकावली!

November 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon