• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात!

सुरुवातीला ४० हजारांची मागणी; दोन वरिष्ठ तंत्रज्ञांचाही सहभाग, एसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे तसेच सर्व्हिस वायर बायपास करून वीज चोरी होत असल्याचे सांगत कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणात त्याच्यासोबत असलेल्या दोन वरिष्ठ तंत्रज्ञांनाही ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात विशाल वसंत नेमाडे (वय ३७, पद सहाय्यक अभियंता, वर्ग-२, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जळगाव शहर महसूल व देयक उपविभाग, जळगाव, रा. योगेश्वर नगर, जळगाव), भरत कडू तायडे (वय ४५, वरिष्ठ तंत्रज्ञ, वर्ग-३, महावितरण, रा. लक्ष्मीनगर, सावखेडा शिवार, कोल्हे हिल्सजवळ, जळगाव) आणि रवींद्र छन्नू पाटील (वय ४१, वरिष्ठ तंत्रज्ञ, वर्ग-३, महावितरण, ह.मु. जळगाव, मूळ रा. झुरखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणातील तक्रारदार हे जळगाव शहरातील ४० वर्षीय रहिवासी आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिन्ही संशयितांनी तक्रारदारांच्या घरी जाऊन नवीन वीज मीटरची तपासणी केली. यावेळी मीटर तसेच घरातील विद्युत उपकरणांचे फोटोही काढण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ भरत तायडे याने तक्रारदारांना फोन करून जळगावातील पांडे चौक येथे बोलावून घेतले. तेथे तिन्ही जणांनी घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे आणि सर्व्हिस वायर बायपास करून वीज चोरी होत असल्याचा दावा केला. या प्रकरणी वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच पुढील कारवाई टाळण्यासाठी तक्रारदारांकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली.

मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी तत्काळ जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी केली. यावेळी भरत तायडे आणि रवींद्र पाटील यांनी स्वतःसह सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांच्यासाठी सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर ठरल्याप्रमाणे पांडे चौक परिसरात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी भरत तायडे याने तक्रारदारांना लाचेची रक्कम सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार नेमाडे यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, बाळू मराठे, राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.


 

 

Previous Post

निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात!
क्राईम

जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात!

November 15, 2026
निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!
खान्देश

निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!

November 14, 2026
रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात!
खान्देश

रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात!

November 14, 2026
अहिल्यादेवींचा लोकसेवेचा वारसा आणि सिंहस्थासाठी गिरीशभाऊंचा विकासाचा संकल्प
खान्देश

अहिल्यादेवींचा लोकसेवेचा वारसा आणि सिंहस्थासाठी गिरीशभाऊंचा विकासाचा संकल्प

November 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात!

जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात!

November 15, 2026
निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!

निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!

November 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon