अमळनेरमध्ये घरासमोरून ४५ हजारांची मोटारसायकल चोरी


अमळनेर, प्रतिनिधी : शहरातील डोके रोडवरील केले नगर परिसरात घरासमोर उभी केलेली ४५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, राधेश्याम पांडुरंग पाटील (वय ५२, रा. केले नगर, सिम रोड, अमळनेर) यांची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एमएच १९ डीजेड १४७९) घरासमोर उभी होती. ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेपासून ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. सकाळी मोटारसायकल जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर शोध घेण्यात आला; मात्र ती मिळून आली नाही.
याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.








