• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!

दोन्ही बाजूंना स्ट्रोक आणि किडनीच्या गंभीर समस्यांशी लढा; महादेव हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा

जळगाव : ‘जाको राखे साईयां, मार सके ना कोय!’ या म्हणीचा प्रत्यय जळगाव येथील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आला. मेंदूला रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे आलेला स्ट्रोक, शरीराच्या डाव्या बाजूला अशक्तपणा, बोलण्यास त्रास तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि किडनीच्या गंभीर समस्यांमुळे अत्यवस्थ झालेल्या ५६ वर्षीय रुग्णाच्या प्रकृतीत १४ दिवसांच्या उपचारांनंतर सुधारणा झाली.

न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे आणि विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयातून रुग्णावर उपचार करण्यात आले. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी ५६ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.स्ट्रोकची लक्षणे,डाव्या बाजूला अशक्तपणा आणि बोलण्यात अडचण येत असल्याने तातडीने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती. रुग्णाला यापूर्वीपासून टाईप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि किडनीचा जुनाट आजार होता. या पार्श्वभूमीमुळे उपचार अधिक आव्हानात्मक बनले होते.

तपासण्यांतून मेंदू आणि किडनीच्या समस्यांचे निदानरुग्णालयात दाखल केल्यानंतर एमआरआय ब्रेन, रक्त तपासण्या आणि हृदयाची तपासणी करण्यात आली. मेंदूमध्ये रक्तपुरवठ्याशी संबंधित इस्केमिक बदल आढळले. रक्तातील युरिया आणि सिरम क्रिएटिनिनचे प्रमाण वाढलेले असल्याने किडनीच्या कार्यक्षमतेबाबतही विशेष काळजी घेणे आवश्यक होते. हृदयाच्या २ॄ इको तपासणीत इजेक्शन फ्रॅक्शन ५८ टक्के आढळले.किडनीचे कार्य कमी झाल्यामुळे रक्तातील टाकाऊ पदार्थ वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी रुग्णाच्या एकूण प्रकृतीचे बारकाईने निरीक्षण केले.

क्रिएटिनिनचे प्रमाण ७ ते ८ पर्यंत वाढल्याने डायलिसिसची शक्यताही विचाराधीन होती. मात्र, रुग्णाची मेंदूविषयक स्थिती आणि इतर वैद्यकीय बाबी लक्षात घेऊन तज्ज्ञांनी औषधोपचार, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि आवश्यक वैद्यकीय व्यवस्थापनावर भर दिला. न्यूरोलॉजी, मेडिसिन, नेफ्रोलॉजी आणि भूलतज्ज्ञ विभागांच्या समन्वयातून रुग्णावर उपचार करण्यात आले. औषधोपचारांसोबत फिजिओथेरपी देऊन शरीराची ताकद आणि हालचाली सुधारण्यावर भर देण्यात आला. रुग्णाच्या प्रकृतीतील बदलांनुसार उपचारांचे सातत्याने मूल्यमापन करण्यात आले.

या उपचार प्रक्रियेत न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे, मेडिसिन विभागाचे डॉ. जयेश पाटील, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अभय जोशी,डॉ. हितेश मोरे, डॉ. आशिक शेख आणि कार्डियाक भूलतज्ज्ञ डॉ. वर्षा वारके यांच्यासह नर्सिंग स्टाफ व व्यवस्थापकीय कर्मचार्‍यांनी योगदान दिले.अत्यंत गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितीत सातत्याने उपचार केल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.रुग्णाला १९ ऑक्टोबर २०२६ रोजी डिस्चार्ज देण्यात आला. स्ट्रोकसारख्या गंभीर आजारासोबत किडनीच्या समस्यांचेही व्यवस्थापन – डॉ. कमलेश तायडे, न्यूरोलॉजिस्ट स्ट्रोकसारख्या गंभीर आजारासोबत किडनीच्या समस्यांचेही व्यवस्थापन करावे लागलेल्या या प्रकरणात वेळेवर वैद्यकीय मदत, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि विविध विभागांतील समन्वय महत्त्वाचा ठरला.

या रुग्णाला मेंदूच्या दोन्ही बाजूंना स्ट्रोकचा परिणाम झाला होता. त्यासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि किडनीचा जुनाट आजार असल्याने उपचार करताना अनेक वैद्यकीय आव्हाने होती. सातत्यपूर्ण निरीक्षण आणि योग्य उपचारांमुळे रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली वेळेवर उपचार सुरू करणे आणि प्रत्येक विभागाचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळी उत्साहात चिमुकल्यांनी लुटला आनंद!

Next Post

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: अर्जांच्या छाननीत ९३ जणांचे अर्ज बाद; दिग्गजांना धक्का तर रक्षा खडसे यांना दिलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा बँक निवडणूक: अर्जांच्या छाननीत ९३ जणांचे अर्ज बाद; दिग्गजांना धक्का तर रक्षा खडसे यांना दिलासा

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: अर्जांच्या छाननीत ९३ जणांचे अर्ज बाद; दिग्गजांना धक्का तर रक्षा खडसे यांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
Uncategorized

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 3, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
क्राईम

जळगाव जिल्ह्यात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

November 3, 2026
जळगाव जिल्हा बँक निवडणूक: अर्जांच्या छाननीत ९३ जणांचे अर्ज बाद; दिग्गजांना धक्का तर रक्षा खडसे यांना दिलासा
Uncategorized

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: अर्जांच्या छाननीत ९३ जणांचे अर्ज बाद; दिग्गजांना धक्का तर रक्षा खडसे यांना दिलासा

November 3, 2026
‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!
खान्देश

‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!

November 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 3, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव जिल्ह्यात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

November 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon