भारतीय वायुसेनेत कार्यरत डॉ. मंगेश कुवर यांना पीएचडी

कर्तव्य बजावत मिळवले यश
जळगाव, प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील गिरड येथील रहिवासी आणि भारतीय वायुसेनेत कर्नाटकातील बंगळुरू येथे कार्यरत असलेले डॉ. मंगेश प्रल्हाद कुवर यांनी ‘महाराष्ट्रातील दलित समाजाची प्रगती आणि जनजागृती यामध्ये मराठी वर्तमानपत्रांचे योगदान (१९०० ते १९५०)’ या विषयावरील संशोधनासाठी पीएचडी पदवी संपादन केली आहे. उत्तराखंड येथील महाराजा अग्रसेन हिमालयन गढवाल विद्यापीठातून त्यांनी ही पदवी प्राप्त केली.
भारतीय वायुसेनेतील जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत डॉ. कुवर यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले. कर्तव्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी संशोधन व अभ्यास सुरू ठेवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांनी आपल्या संशोधनाला दिशा दिली.
विशेष म्हणजे, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान गुजरातमधील भुज-नलिया येथे कर्तव्यावर असतानाही त्यांनी देशसेवेची जबाबदारी पार पाडली. प्रतिकूल परिस्थिती आणि आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश परिसरासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह उर्दू भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे.
या यशाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. मंगेश कुवर यांनी आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद, आई-वडील, पत्नी आणि भावाने दिलेला पाठिंबा तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच आपण या टप्प्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले. संशोधन मार्गदर्शक डॉ. सुचिता उपाध्याय, डॉ. के. के. मिश्रा, डॉ. लक्ष्मी दीक्षित, पीएचडी अधिष्ठाता डॉ. शैलेश कुमार सिंह तसेच अन्य प्राध्यापकांचे त्यांनी आभार मानले.
विद्यापीठातील पदवी प्रदान सोहळ्यात डॉ. मंगेश कुवर यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे उपकुलाधिपती डॉ. एन. के. सिन्हा यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक विचार रुजतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी मिळवणे किंवा सुशिक्षित होणे एवढाच नसून व्यक्तिमत्त्व, विचार आणि सामाजिक जबाबदाऱ्यांचा विकास करणे हाही आहे, असे डॉ. सिन्हा यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आजही सुसंगत असून, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या संदर्भात अशा विचारांचा अभ्यास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. कुवर आपल्या ज्ञान, अनुभव आणि संशोधनाच्या माध्यमातून समाज व शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. मंगेश कुवर यांच्या या यशाबद्दल गिरड परिसरासह हितचिंतक आणि परिचितांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना डॉ. मंगेश कुवर म्हणाले की, ते आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाने, आई-वडिलांच्या आणि पत्नी, भाऊ यांच्या पाठिंब्याने, तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाने या स्थानापर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी आपले संशोधन मार्गदर्शक डॉ. सुचिता उपाध्याय, डॉ. के. के. मिश्रा, डॉ. लक्ष्मी दिक्षीत, पीएचडी डीन डॉ .शैलेश कुमार सिंह आणि आपल्या मार्गदर्शक प्राध्यापकांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, या संशोधन प्रवासात त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, विश्वविद्यालयातील सोहळ्यात शिक्षक आणि इतरांनी मंगेश कुंवर यांना पीएचडी पदवी प्रदान केली. विद्यापीठाचे उप कुलाधीपती डॉ. एन. के. सिन्हा यांनी या यशाबद्दल डॉ. मंगेश कुवर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले की, शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक विचार रुजतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी मिळवणे किंवा सुशिक्षित होणे हा नाही, तर व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि सामाजिक जबाबदाऱ्या विकसित करणे हा देखील आहे. ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आजही सुसंगत आहेत. नवीन शिक्षण धोरण २०२० च्या संदर्भात अशा विचारांचा अभ्यास करणे हे शिक्षणाची व्यापक उद्दिष्ट्ये समजून घेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की, डॉ. मंगेश कुवर त्यांच्या ज्ञान, अनुभव आणि संशोधनाच्या माध्यमातून समाज आणि शिक्षणासाठी योगदान देत राहतील.









