असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची निवड

जळगाव, प्रतिनिधी : नुकतेच महाराष्ट्र चॅप्टर ऑफ असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे वार्षिक मतदान पार पडले. यात जळगावच्या डॉ. स्नेहल फेगडे यांची सचिव म्हणून आणि डॉ. रोहन पाटील यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ही जळगाव शहरासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
पूर्वी दोन वेळा डॉ. स्नेहल फेगडे यांनी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम बघितले आहे. तरी पहिल्यांदा ग्रामीण भागातील सर्जनला मुंबई-पुण्यानंतर प्रथमच संधी मिळाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. तसेच, डॉ. रोहन पाटील यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रथम निवड झालेली आहे. पहिल्यांदाच जळगाव शहरातून कार्यकारिणीवर जाण्याचा मान दोघांना मिळाल्यामुळे त्यांचे अतिशय कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
डॉ. स्नेहल फेगडे व डॉ. रोहन पाटील यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन, जळगाव शाखा तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व सर्जरी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.









