• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..

५ हजार शाळांपर्यंत पोहचणार; जैन हिल्सला झालेल्या बैठकीत २० जिल्ह्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग..

जळगाव, (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त सहकार्याने पुढील पाच ते दहा वर्षात ५ हजार शाळांपर्यंत ‘चेस इन स्कूल’ हा उपक्रम राबविला जाईल. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या जैन हिल्स येथे झालेल्या बैठकीत याबाबतचे उद्दिष्ट ठरले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले हे व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते ‘चेस इन स्कूल’ या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. या बैठकीत राज्यातील जवळपास २० जिल्ह्यांचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

२००८ पासून अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज संघटना देशातील अग्रगण्य संघटनांपैकी एक बनली आहे. राज्यातील ३३ जिल्हे संघटनेशी संलग्न आहेत. गेल्या आठ, दहा वर्षांपासून मागे पडलेला ‘चेस इन स्कूल’ हा उपक्रम अशोक जैन, अतुल जैन यांच्या पुढाकाराने आज पुन्हा सुरू करण्यात आला. या उपक्रमाच्या पुनरुज्जीवनासाठी जैन इरिगेशन, जैन स्पोर्टस् अकॅडमीने पुढाकार घेतल्याबद्दल अशोक जैन व अतुल जैन यांचे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे आभार व्यक्त करून अशोक जैन यांचा अभिजीत कुंटे यांनी तर अतुल जैन यांचा चेस इन स्कूल उपक्रमाचे सचिव विलास म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘चेस इन स्कूल’ लोगोचे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. या उपक्रमाची पहिली शाळा ही अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतन ठरली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बुद्धिबळाचे साहित्य देण्यात आलीत ती प्राचार्य मनोज परमार सह शाळेतील सहकाऱ्यांनी स्वीकारली.

खेळाडू घडविणे हेच ध्येय – अशोक जैन
उपस्थितांशी अशोक जैन यांनी संवाद साधला, बुद्धिबळाशी माझा अभिजीत कुंटे यांच्यामुळे संबंध आला. सुरुवातीपासूनच पक्ष, धर्म, समाज आणि व्यावसायिक भेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन बुद्धिबळाचा विकास करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. खेळात राजकारण नको, तर खेळाडू घडविणे हेच आपले ध्येय असावे. ‘चेस इन स्कूल’ हा उपक्रम महाराष्ट्रातील बुद्धिबळ विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी आर्थिक, मनुष्यबळ व संघटनात्मक सहकार्य देऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची आमची तयारी आहे. पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राने तमिळनाडूपेक्षा अधिक प्रगती करावी, हे आपले ध्येय असावे. हीच आपली भूमिका असली पाहिजे असेही ते म्हणाले.

‘चेस इन स्कूल’ उपक्रम मिशन मोडवर राबविणे – अतुल जैन
‘चेस इन स्कूल’ उपक्रम पुन्हा सुरू होत असल्याबद्दल अतुल जैन म्हणाले की, महाराष्ट्र बुद्धिबळ क्षेत्र प्रगतीवर आहे. अशोक जैन यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ग्रॅण्डमास्टरची संख्या दोनवरून १४ पर्यंत पोहोचली, तर महिला खेळाडूंच्या कामगिरीतही उल्लेखनीय वाढ झाली. ‘चेस इन स्कूल’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला सुरुवातीला दहा शाळा सहभागी करण्याचे लक्ष्य ठेवावे लागेल. शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम मिशन मोडवर राबविणे आवश्यक असल्यांचे अतुल जैन म्हणाले.

नव्या पिढीसाठी बुद्धिबळ अत्यंत प्रभावी…
आजच्या वेगाने बदलणाऱ्या एआयच्या युगात नव्या पिढीची विचारक्षमता, एकाग्रता, निर्णयक्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी बुद्धिबळ हे अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकते. खेळातून टीमवर्क, कौशल्य, पराभव स्वीकारण्याची ताकद आणि विजयात नम्र राहण्याचे संस्कार रुजतात. विशेषतः तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण करून त्याचा पाया शाळास्तरावर भक्कम करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

फोटो कॅप्शन –
(_DSC0524) – ‘चेस इन स्कूल’ उपक्रमाची सुरवात करताना अशोक जैन, अतुल जैन, अभिजीत कुंटे, निरंजन गोडबोले, विलास म्हात्रे, चिंदबर किटी भास्कर, राजेंद्र कोंडे, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे यांच्यासह विविध जिल्ह्यामधील प्रतिनिधी.


 

 

Tags: https://kesariraj.com/ches-in-shcool-punha-jomane/
Previous Post

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मोफत नेत्र तपासणी उपक्रम- वरणगावातील ‘वासुदेव नेत्रालया’चा माणुसकीचा हात

Next Post

महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !
क्राईम

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

October 31, 2026
खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास
क्राईम

खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास

October 31, 2026
महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी
खान्देश

महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

October 31, 2026
‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..
खान्देश

‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..

October 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

October 31, 2026
खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास

खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास

October 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon