• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कासोदा पोलीस व एरंडोल महसूल विभागाची वाळूमाफियांवर संयुक्त धडक कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कासोदा पोलीस व एरंडोल महसूल विभागाची वाळूमाफियांवर संयुक्त धडक कारवाई

४ वाहने आणि ७६ ब्रास वाळूसह ३१.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/10/WhatsApp-Video-2026-10-26-at-16.57.14.mp4

कासोदा (प्रतिनिधी) :- कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत वाळूची अवैध वाहतूक करणारी ४ अवजड वाहने आणि १६ ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, नदीपात्रात अवैधरीत्या साठवून ठेवलेला ६० ब्रास वाळूचा मोठा साठाही जप्त करण्यात आला आहे.

अशी एकूण ७६ ब्रास वाळू व ४ वाहनांसह ३१ लाख ५८ हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाने हस्तगत केला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस आणि एरंडोल महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने २५ व २६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास ही धडक मोहीम राबवली.

उत्राण, मारुती मंदिराजवळ: २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ६ चाकी टाटा आयशर (क्र. MH-18 BG-7208) ५ ब्रास वाळूसह मिळून आला. पथकाला पाहताच चालक वाहन जागेवर सोडून फरार झाला. या कारवाईत वाहनासह ६ लाख २३ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. करदन शिवार, गिरणा नदीपात्र (डंपर जप्त): २६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास निळ्या रंगाचा टाटा डंपर (क्र. MH-18 CB-1920) ८ ब्रास वाळूसह पकडण्यात आला. या प्रकरणी वाहनमालक निलेश राजेंद्र भदाणे व चालक रामू महादेव शिवाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ८ लाख ३७ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

करदन शिवार, गिरणा नदीपात्र (आयशर जप्त): २५ ऑक्टोबर रोजी रात्री १:३० वाजेच्या सुमारास चॉकलेटी रंगाचे आयशर वाहन (क्र. MH-20 GC-9147) २ ब्रास वाळू वाहतूक करताना पकडले. या प्रकरणी शाहरुख शब्बीर पठाण याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत ६ लाख ९ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. करदन शिवार, गिरणा नदीपात्र (दुसरा डंपर जप्त): २५ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास टाटा कंपनीचा निळसर डंपर (क्र. MH-48 AG-1593) १ ब्रास वाळूसह मिळून आला. या प्रकरणी भूषण शिवाजी सोनवणे (रा. विचूर, ता. जि. धुळे) याच्याविरुद्ध कारवाई करत ८ लाख ४ हजार ७०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ६० ब्रास वाळूचा साठा तहसील कार्यालयात हलवलाया वाहनांव्यतिरिक्त करदन शिवारातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी साठवून ठेवलेला ६० ब्रास वाळूचा ढिगारा पथकाने जप्त केला असून, तो सुरक्षिततेच्या दृष्टीने एरंडोल तहसील कार्यालयात हलविण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) सह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारवाई करणारे पथक:ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत पाटील, पोलीस अंमलदार नितीन सूर्यवंशी, धर्मेंद्र ठाकूर, श्रीकांत ब्राम्हणे, निलेश गायकवाड, योगेश पाटील तसेच तहसीलदार गोपाळ पाटील, मंडळ अधिकारी नदीम शेख (उत्राण), ग्राम महसूल अधिकारी रवीराज पाटील, वैभव पाटे, संदीप पाटील आणि नरेंद्र पाटील यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.

Tags: kasoda-polis-v-erodol-mahsul vibhagachi valu mafiyanvar sayukt karvai news
Previous Post

अमळनेरमध्ये महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप ; गुन्हा दाखल

Next Post

मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान;चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान;चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ

मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान;चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान;चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ
खान्देश

मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान;चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ

October 26, 2026
कासोदा पोलीस व एरंडोल महसूल विभागाची वाळूमाफियांवर संयुक्त धडक कारवाई
क्राईम

कासोदा पोलीस व एरंडोल महसूल विभागाची वाळूमाफियांवर संयुक्त धडक कारवाई

October 26, 2026
अमळनेरमध्ये महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप ; गुन्हा दाखल
क्राईम

अमळनेरमध्ये महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप ; गुन्हा दाखल

October 26, 2026
जळगावात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; संशयित आरोपी अटकेत
क्राईम

जळगावात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; संशयित आरोपी अटकेत

October 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान;चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ

मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान;चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ

October 26, 2026
कासोदा पोलीस व एरंडोल महसूल विभागाची वाळूमाफियांवर संयुक्त धडक कारवाई

कासोदा पोलीस व एरंडोल महसूल विभागाची वाळूमाफियांवर संयुक्त धडक कारवाई

October 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!