जळगाव आयएमए शाखेच्या शिरपेचात तिसर्यांदा पुरस्कार
जळगाव ( प्रतिनिधी ) – इंडियन मेडिकल असोसिएशन (खचअ), महाराष्ट्र राज्याच्या वतीने जळगाव शाखेचे डॉ. भरत बोरोलें यांची सन २०२५-२६ या वर्षासाठीच्या ‘प्रेसिडेंट्स अॅप्रिसिएशन अवॉर्ड्स फॉर बेस्ट सेक्रेटरी — बिग ब्रँच’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील योगदान, डॉक्टरांच्या संघटनेसाठी केलेले समर्पित कार्य आणि आयएमएच्या माध्यमातून दिलेल्या सेवांची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे डॉ. भरत बोरोलें यांना पुरस्कार निवडीची माहिती दिली. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर येथील उत्तर अंबाझरी रोडवरील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स सभागृहात आयोजित आयएमए महाराष्ट्र राज्याच्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात येणार आहे. हा सोहळा ‘मास्टाकॉन २०२६’ परिषदेचा भाग असून, यावेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून डॉ. बोरोलें यांचा गौरव करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन ही वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची महत्त्वपूर्ण संघटना असून, डॉक्टरांमध्ये समन्वय साधणे, वैद्यकीय सेवेला प्रोत्साहन देणे आणि संघटनात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविणे यामध्ये शाखेच्या सचिवांची भूमिका महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर डॉ. भरत बोरोलें यांची पुरस्कारासाठी झालेली निवड जळगाव शाखेसाठी गौरवास्पद मानली जात आहे.या सन्मानामुळे आयएमए जळगाव शाखेच्या कार्याला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून,
माजी खा. डॉ. उल्हास पाटील डॉ. अनिल पाटील डॉ. शशिकांत गाजरे डॉ. स्नेहल फेगडे डॉ. विलास भोळे डॉ.अनिता भोळे डॉ. धनंजय बोरोले डॉ. पंकज शहा आणि टीम आय एम ए तसेच वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. भरत बोरोलें यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










