पारंपरिक वेशभूषा, गरबा-दांडियाची धूम; विद्यार्थ्यांनी सादर केले कलागुण
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, गरबा-दांडियाचा ताल आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महाविद्यालय परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. या उत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बेस्ट कॉस्च्युम/आउटफिट स्पर्धा,बेस्ट कपल दांडिया स्पर्धा, तर ग्रुप गरबा स्पर्धा घेण्यात आली. यासोबतच गरबा किंग आणि गरबा क्वीन यांचीही निवड करण्यात आली.नवरात्रोत्सवाच्या अंतिम दिवशी गोदावरी फाउंडेशनचे सदस्य आणि प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धांमध्ये बेस्ट कॉस्च्युम/आउटफिट पुरस्कार सानिका कारंडे आणि रोहित पाटील यांनी पटकावला. बेस्ट कपल म्हणून अनुष्का बर्हाटे आणि सुमित थिगळे यांची निवड झाली, तर ग्रुप गरबा स्पर्धेत एल.वाय. ग्रुपने बाजी मारली. गरबा किंगचा मान वृषभ सुतार याला, तर गरबा क्वीनचा मान अश्विनी ठाकरे हिला मिळाला.या नवरात्रोत्सवाचे समन्वयन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन विद्यार्थिनी देवयानी पाटील हिने केले. यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजक व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.











