• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अपघातात फुफ्फुसाला गंभीर दुखापत झालेल्या २१ वर्षीय तरुणाचे वाचले प्राण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
Auto Draft

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

जळगाव : अपघातात गंभीर दुखापत झाल्याने दोन्ही फुफ्फुसांत रक्त व हवा साचून फुफ्फुसांचा आकार लहान झालेल्या २१ वर्षीय तरुणाचे प्राण वाचविण्यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमला यश आले. रुग्णाला श्वास घेण्यास मोठा त्रास होत असताना तातडीने करण्यात आलेल्या इंटरकॉस्टल ड्रेन इनसर्शन प्रक्रियेमुळे फुफ्फुसांवरील दाब कमी करण्यात आला. त्यानंतर कृत्रीम श्वासोच्छवासाचा पुरवठा, औषधोपचार आणि विशेष काळजी घेतल्याने रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारली
याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील प्रबुध्द नामक २१ वर्षीय तरुणाचा अपघात झाल्यानंतर त्याच्या डोक्याला मार लागला होता. तसेच छातीला गंभीर दुखापत होऊन बरगड्यांना फ्रॅक्चर झाले होते. अपघातामुळे दोन्ही फुफ्फुसांमध्ये रक्त व हवा साचल्याने फुफ्फुसांचा आकार कमी झाला होता. परिणामी रुग्णाला श्वास घेण्यास मोठा त्रास होत होता. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव फरके यांच्या टीमने रुग्णाची तातडीने तपासणी केली. रुग्णाची स्थिती आणि छातीतील दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळ न दवडता आवश्यक उपचार सुरू करण्यात आले.दोन्ही फुफ्फुसांमध्ये रक्त व हवा साचल्यामुळे श्वसनक्रियेवर परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत फुफ्फुसांवरील दाब कमी करून त्यांना पुन्हा विस्तारण्यास मदत करणे आवश्यक होते. त्यानुसार रुग्णावर तातडीने आयसीडी इनसर्शन शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेद्वारे छातीमध्ये साचलेली हवा व रक्त बाहेर काढण्यास मदत झाली आणि फुफ्फुसांना पुन्हा विस्तारण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण झाली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही काळ कृत्रीम श्वासोच्छवासाचा पुरवठा देण्यात आला. त्यासोबत आवश्यक औषधोपचार, सतत निरीक्षण आणि विशेष काळजी घेण्यात आली. उपचारांना रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला आणि त्याची श्वसनक्रिया हळूहळू सुधारू लागली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. वैभव फरके यांना डॉ. शार्दुल कमले, डॉ. सुशांत जाधव, डॉ. दिशा राका, डॉ. रोहीत बुक्का, डॉ. रोहीत कोळी यांनी सहकार्य केले.

अपघातानंतर रुग्णाची स्थिती गंभीर होती. दोन्ही फुफ्फुसांमध्ये रक्त व हवा साचल्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला होता. अशा वेळी उपचारांमध्ये होणारा विलंब धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे रुग्णालयात दाखल होताच आवश्यक तपासण्या करून तातडीने आयसीडी इनसर्शन करण्यात आले. त्यानंतर कृत्रीम श्वासोच्छवासाचा पुरवठा, औषधोपचार आणि सतत निरीक्षण यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. वेळेवर उपचार मिळणे आणि वैद्यकीय पथकाने घेतलेली तत्परता यामुळे रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य झाले.

– डॉ. वैभव फरके,

डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

Next Post

पाचोऱ्यात दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक चोरीला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोऱ्यात दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक चोरीला

पाचोऱ्यात दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीवर कोयत्याने हल्ला; रामानंदनगरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीवर कोयत्याने हल्ला; रामानंदनगरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 13, 2026
पाचोऱ्यात दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक चोरीला
क्राईम

पाचोऱ्यात दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक चोरीला

October 13, 2026
Auto Draft
खान्देश

अपघातात फुफ्फुसाला गंभीर दुखापत झालेल्या २१ वर्षीय तरुणाचे वाचले प्राण

October 13, 2026
Auto Draft
खान्देश

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीवर कोयत्याने हल्ला; रामानंदनगरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीवर कोयत्याने हल्ला; रामानंदनगरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 13, 2026
पाचोऱ्यात दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक चोरीला

पाचोऱ्यात दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक चोरीला

October 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon