जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जळगाव शहरात प्रथमच आगमन झाले असता, जळगाव प्रदेश तेली समाजाच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समाज बांधवांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

या सदिच्छा भेटीदरम्यान समाजातील विविध विषयांवर आणि युवक व महिलांच्या सक्षमीकरणावर सकारात्मक चर्चा झाली. या प्रसंगी नाशिक विभागीय युवक अध्यक्ष (प्रदेश तेली महासंघ) प्रशांत सुरळकर, नाशिक विभागीय युवक कार्याध्यक्ष विनोद चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष निर्मलाताई चौधरी, जळगाव शहर महानगरप्रमुख (महिला) मनीषाताई चौधरी, तसेच शहर प्रमुख धनंजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच यावेळी रवींद्र चौधरी, प्रदीप चौधरी, योगराज चौधरी, शिवाप्पा चौधरी, वैभव चौधरी, आरोग्यदूत शिवाजी पाटील, प्रमोद चौधरी, दीपक मंडवले यांच्यासह तेली समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









