चोपडा-शिरपूर बायपासवरील निरज रोडलाइन्स ट्रान्सपोर्टच्या आवारातील घटना; २० ते २५ वर्षीय अनोळखी तरुणावर चोरीचा संशय
चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा शहरातील चोपडा-शिरपूर बायपास रस्त्यालगत असलेल्या निरज रोडलाइन्स ट्रान्सपोर्टच्या आवारातील पाण्याच्या हौदाजवळून ४५ हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कश्मीरसिंग घनश्यामसिंग चव्हाण (वय २१ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. बलवाकाबास, ता. बानसूर, जि. कोटपूतली-बहरोड, राजस्थान) यांनी याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी यांचा मोबाईल क्रमांक ८००३२४९७५३ असा आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता चोपडा शहरातील चोपडा ते शिरपूर बायपास रोडच्या बाजूला असलेल्या निरज रोडलाइन्स ट्रान्सपोर्टच्या आवारातील पाण्याच्या हौदाजवळ ते असताना, अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाने त्यांच्या संमतीशिवाय व लबाडीच्या इराद्याने त्यांचा मोबाईल चोरून नेला.
चोरीस गेलेला मोबाईल हा रिअलमी कंपनीचा गोल्डन रंगाचा अँड्रॉईड मोबाईल हँडसेट असून त्याची किंमत सुमारे ४५ हजार रुपये आहे. सदर मोबाईलचे IMEI क्रमांक ८६९८८३०८४३८६७१२ व ८६९८८३०८४३८६७०४ असे आहेत. तसेच त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिमकार्ड वापरण्यात येत होते.
मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी कश्मीरसिंग चव्हाण यांनी चोपडा शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०२/२०२६ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत वाडिले, नेमणूक चोपडा शहर पोलिस ठाणे, करीत आहेत. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









