गोदावरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक शैक्षणिक भेट; स्काडा, रिफ्रिजरेशन व दुग्धप्रक्रियेची घेतली प्रत्यक्ष माहिती
जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (तंत्रनिकेतन), जळगाव येथील डिप्लोमा विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादितच्या ‘विकास दूध फेडरेशन’ प्रकल्पाला औद्योगिक शैक्षणिक भेट दिली. अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवाची जोड मिळावी, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची कार्यपद्धती विद्यार्थ्यांना समजावी, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले.
भेटीदरम्यान विकास दूध फेडरेशनच्या तज्ज्ञ अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना दूध संकलन, शीतकरण व रिफ्रिजरेशन, पाश्चरायझेशन, प्रक्रिया आणि पॅकेजिंग या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी दूध प्रक्रिया व पॅकेजिंगमधील स्वयंचलित प्रणालींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.दूध पावडर, तूप, पनीर, श्रीखंड आदी दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आधुनिक ऑटोमेशन व डउअॄअ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसे केले जाते, याचीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणार्या यंत्रसामग्री, नियंत्रण प्रणाली, इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि स्वयंचलित यंत्रणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी पाहिले. औद्योगिक उत्पादन प्रक्रियेत ऑटोमेशन, विद्युत नियंत्रण, रिफ्रिजरेशन आणि इंडस्ट्रीयल मॅनेजमेंटची भूमिका विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने समजून घेतली. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष उद्योगातील प्रक्रियांशी संबंध जोडण्यास विद्यार्थ्यांना मदत झाली. या शैक्षणिक भेटीचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, पॉलिटेक्निक समन्वयक प्रा. दीपक झांबरे आणि अकॅडमिक डीन प्रा. नितीन पाटील यांनी केले. यावेळी प्रा. वैभव झांबरे, प्रा. सचिन चिंचोले, प्रा. हर्षा पाटील, प्रा. ऋतुजा पाटील व प्रा. आकाश मुराई उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानवृद्धीसाठी आयोजित या उपक्रमाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.











