• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर कारवाई; ७४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर चोरी, इलेक्ट्रिक मोटार चोरी, एमएसईबी केबल चोरी यासह अन्य ठिकाणाहून चोरी केलेल्या मालाची विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने भंगार दुकानांची तपासणी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी दिले होते. त्यानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या पथकाने दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी भंगार दुकानांवर धडक कारवाई केली. या कारवाईत चोरीचा संशय असलेला एकूण ७४ हजार ८०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नाईक अतुल पवार, पोलिस नाईक अभिजीत निकम, पोलिस नाईक/पदिपक आहिरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रविण देशमुख, भारत पाटील, शाम हडकर, मनोज बडगुजर, नामदेव इंगळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिस पथकाने भोकरी गावातील भंगार दुकानांची तपासणी केली असता आरोपी कलीम नबी काकर यांच्या भंगार दुकानातून सुमारे ३२ किलो वजनाची कॉपरची तार, तसेच हकीम अब्बास काकर यांच्या भंगार दुकानातून सुमारे १८ किलो कॉपरची तार आणि राजू उस्मान काकर यांच्या भंगार दुकानातून सुमारे १४ किलो कॉपरची तार आढळून आली.
तसेच लोहरा खुर्द गावातील अब्दुल हकीम काकर यांच्या भंगार दुकानातूनही कॉपरची तार व इतर साहित्य आढळून आले. सदर मालाबाबत समाधानकारक माहिती अथवा कागदपत्रे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी संशयित माल ताब्यात घेतला.
सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत ७४ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. सदर माल चोरीचा असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, चोरीच्या गुन्ह्यांशी या मालाचा संबंध आहे का, याबाबत तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नवघरे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक तसेच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.

Tags: pachora pimpalgav hareshwar police steshan news
Previous Post

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

September 30, 2026
धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले
क्राईम

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

September 30, 2026
जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा
खान्देश

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विविध क्रिडास्पर्धेत यशस्वी कामगीरी

September 30, 2026
जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा
क्राईम

जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा

September 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

September 30, 2026
धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

September 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!