शिरसोली ( प्रतिनिधी ) – बारी समाज माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा व बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन केले. खो-खो स्पर्धेत 14 व 17 वयोगटातील मुलींच्या स्पर्धा सिताराम चौधरी हायस्कूल किनोद येथे संपन्न झाल्या यात शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक विद्यार्थिनींनी वावडदा नशिराबाद धामणगाव व कानडदा विद्यार्थिनींचा पराभव करून त्या तालुक्यात उपविजेता ठरल्या तसेच 17 वर्ष वयोगटातील मुलींनी नशिराबाद किनोद व कानडदा वावडदा या शाळेतील विद्यार्थ्यांचा पराभव करून फायनल मध्ये विजेत्या होऊन त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे तसेच कांताई हॉल जळगाव येथे बुद्धिबळ स्पर्धेत रोहित हागे हा विद्यार्थी विजेता ठरून त्याची सुद्धा जिल्हास्तरावर निवड झाली. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक श्री एस के काटोले यांचे मार्गदर्शन लाभले. बारी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस आंबटकर संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश भाऊ खलसे तसेच सर्व संचालक मंडळ शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले.










