• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चारित्र्याच्या संशयातून जळगावात तरुणावर चाकूने वार; चौघांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चारित्र्याच्या संशयातून जळगावात तरुणावर चाकूने वार; चौघांविरुद्ध गुन्हा

बहिणीवरील संशयाच्या रागातून भावासह चौघांना मारहाण; कोल्हे हिल्स परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या भावासह त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच एका संशयिताने तरुणाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने छाती व पाठीवर वार करून जखमी केल्याचा आरोप आहे. ही घटना जळगाव शहरातील माऊलीनगर, कोल्हे हिल्स परिसरात १६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर मोहन जयराज (वय ३४, व्यवसाय एअर कंडिशनर दुरुस्ती, रा. गुरुनानक नगर, शनिपेठ, जळगाव) यांचा पत्नी आरती रमेश लोखंडे हिच्यावर चारित्र्याचा संशय असल्याने वाद झाला होता. या कारणावरून आरती हिला राग आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

१६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आरती रमेश लोखंडे, विमला वसंत पवार, किरण वसंत पवार आणि कार्तिक रमेश लोखंडे हे सर्वजण शिवाजी नगर परिसरातून फिर्यादीच्या घरी गेले. तेथे त्यांनी फिर्यादीचा भाऊ राहुल मोहन जयराज व त्यांची पत्नी प्रभा किशोर जयराज यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याचवेळी आरोपी क्रमांक ३ किरण वसंत पवार याने राहुल यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने छाती व पाठीवर वार केल्याने तो जखमी झाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. घटनेनंतर जखमी राहुल याच्यावर उपचार करण्यात आले.

या प्रकरणी किशोर जयराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. श्री. विजय दे. पाटील करीत आहेत. गुन्ह्यातील कोणत्याही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची नोंद पोलिस कागदपत्रात आहे.


 

 

Tags: jalgaon taluka police steshan news
Previous Post

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

Next Post

भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास

भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon